Dehuroad News : पत्रकार रोहित सरदाना यांच्या निधनाच्या बातमीवर सोशल मीडियावर अश्लिल कमेंट, गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज –  पत्रकार रोहित सरदाना यांच्या निधनाबाबत आज तक या वृत्तवाहिनीने सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टवर एका नेटकऱ्याने अश्लील भाषेत कमेंट केली. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रकार समीर शेख यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 30) फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश्वर ठाकूर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज तक या हिंदी वृत्तवाहिनीचे न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे शुक्रवारी (दि. 30) निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल आज तक या वृत्तवाहिनीच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आली.

या पोस्टवर एका व्यक्तीने अश्लील भाषेत कमेंट केली. याबाबत अश्लील भाषेत कॉमेंट करणाऱ्या नेटक-याच्या विरोधात बदनामी केल्याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment