ODI Ranking : विराट कोहलीला मागे टाकून पाकिस्तानचा बाबर आझम ODI रॅकिंगमध्ये अव्वल

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत पाकिस्तानच्या बाबर आझमने एकदिवसीय रॅकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. बाबर आझम 865 रेटिंग पॉईंट्सह आंतरराष्ट्रीय एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने ‘एमआरएफ’ एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. त्यानुसार 865 रेटिंग पॉईंट्सह पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर 857 रेटिंग पॉईंट्सह विराट कोहली आहे तर, 825 रेटिंग पॉईंट्सह रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे.

_MPC_DIR_MPU_II

गोलंदाजीत न्युझीलंडचा ट्रेन्ट बोल्ट 737 पॉईंट्सह पहिल्या स्थानावर आहे तर, 690 पॉईंट्सह भारताचा जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीत न्युझीलंडचा केन विल्यम्सन पहिल्या स्थानावर आहे तर, गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर आहे.

T20 क्रिकेट मध्ये फलंदाजीत इंग्लंडचा डेव्हिड मलान पहिल्या स्थानावर आहे तर, गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेचा तबरेज सामसी पहिल्या स्थानावर आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.