Odisha train accident : ओडिशा रेल्वे अपघातामागे घातपात? रेल्वे बोर्डाने केली सीबीआय चौकशीची शिफारस

एमपीसी न्यूज- ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या सीबीआय चौकशीची शिफारस रेल्वे बोर्डाने केली (Odisha train accident) आहे. हा अपघात रेल्वेचालकाच्या चुकीमुळे घडला नसून, यामागे घातपात आहे. यंत्रणेतील बदलांमुळे हा अपघात झाला असून, त्यातील गुन्हेगार व्यक्ती निश्चित झाल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी सांगितले.

हा अपघात रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील इलेक्ट्रिक पॉइंट मशीन आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलांमुळे घडला आहे. सिग्नल यंत्रणेतील पॉइंट मशिनची सेटिंग बदलण्यात आली होती. ही सेटिंग कशी आणि का बदलण्यात आली, हे चौकशी अहवालातून समोर येईल, असे सांगितले.

‘ज्या पद्धतीने अपघात झाला, ती परिस्थिती पाहता आणि प्रशासकीय माहितीनुसार रेल्वे बोर्डाने या प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे,’ असे वैष्णव म्हणाले. या घटनेचा ‘कवच’ या टक्कर प्रतिबंधक प्रणालीशी काहीही संबंध नसल्याचे देखील ते म्हणाले.

Today’s Horoscope 05 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

‘सिग्नल यंत्रणेतील पॉइंट मशिन आणि इंटरलॉकिंग सिस्टीम चुका होणार नाही अशी व ‘फेल सेफ’ असते. मात्र, या यंत्रणेत बाहेरून हस्तक्षेप झाल्याची शक्यता टाळता येणार नाही,’ असे नवी दिल्लीतील रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘पॉइंट मशिन व इंटरलॉकिंग यंत्रणा ‘फेल सेफ’ असते. म्हणजेच ही यंत्रणा फेल झाल्यास सर्व सिग्नल लाल होतात आणि सर्व रेल्वेचे काम थांबते,’ असे रेल्वेचे संचलन व व्यवसाय विकास सदस्य जयवर्मा सिन्हा यांनी सांगितले.

यंत्रणेत बिघाडाची शक्यता एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने फेटाळून लावली. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित असलेल्या या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेतील गडबड केवळ हेतूत:च असू शकते. ही अंतर्गत किंवा बाह्य घातपाताची घटना असू शकते. आपण काहीही नाकारू शकत नाही,’ असे या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

288 जणांचा मृत्यू व 900 जण जखमी झालेल्या भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या या अपघाताचे…. घातपाताचे…. खरे कारण या सीबीआय (Odisha train accident) चौकशीतून लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.