Vadgaon Maval : प्राधिकरण रोटरी क्लबतर्फे मावळमधील ग्रामीण बांधवांसाठी मधमाशी पालन प्रकल्पासाठी साहित्य

एमपीसी न्यूज- प्राधिकरण रोटरी क्लब यांच्या रोजगार निर्मिती उपक्रमाअंतर्गत आंदरमावळातील बोरवली गावामध्ये मधमाशी पालन व उत्पादन हा एकदिवसीय व्यवसाय प्रशिक्षण व व्यवसायासाठी आवश्यक असणारे साहित्य देण्यात आले.

मेलीफेरा या इटालियन जातीच्या मधमाशी देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये मधमाश्यांपासुन मिळणारे वेगवेगळे फायदे सांगण्यात आले. मधमाशांच्या परागीभवनामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ होते. या प्रकल्पामुळे अर्थिक उत्पादनाबरोबर मधमाशी जतन होण्यास मदत होणार आहे.

प्रशिक्षण देण्यासाठी शिवसागर मधउद्योग समुहाचे विजय महाजन, प्राधिकरण रोटरी क्लबचे अध्यक्ष बहार शहा, नवनाथ शिरसट उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी गावातील तरुण, महिला , ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते. ग्रामस्थांकडुन नाथामहाराज शेलार यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.