Bhosari : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या तरूणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – मुलीचा पाठलाग करून तु मला लई आवडतेस, मला हॉटेलवर भेटतेस का ? आपण मज्जा करू, असे म्हणून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या तरूणावर भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरव आंबिलपुरे (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी 16 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी मुलीचा वारंवार पाठलाग करत होता. तू मला लई आवडतेस, मला हॉटेलवर भेटतेस का ? आपण मज्जा करू, असे म्हणून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच मुलीच्या थोबाडीत मारत तुझा व्हिडीओ बघायचा का? अशी धमकी दिली. तिच्या आईच्या मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठविला. फौजदार ए. आर. डेरे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.