_MPC_DIR_MPU_III

Talegaon : महिलेची वाट अडवून विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेची वाट अडवून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्री साडेआठच्या सुमारास सोमाटणे फाटा येथे घडली. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

संदीप गोविंद राठोड (वय 19, रा. डांगे चौक, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 20 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास सोमाटणे फाटा येथील टाटा सोसायटी समोरून जात होत्या. त्यावेळी आरोपीने महिलेची वाट अडवली. त्यांच्याशी अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. याबाबत महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.