Hinjawadi News : प्राधिकरणाच्या नोटीस कडे दुर्लक्ष करून बांधकाम करणाऱ्या विरोधात गुन्हा 

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर बांधकामाला अनधिकृत बांधकाम व निर्मुलन अप्पर जिल्हाधिकारी व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी नोटीस बजावली होती. तरीही सरकारी आदेशाचे उल्लंघन करून बांधकाम सुरू ठेवणा-या विरोधात शुक्रवारी (दि.09) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

_MPC_DIR_MPU_II

विनायक जयवंत गायकवाड (वय 26) व अनिता विनायक गायकवाड ( दोन्ही रा. जांबे ता. मुळशी) असे आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ‘पीएमआरडी’चे सहाय्यक नगररचनाकार विवेक प्रभाकर डुब्बेवार (वय 36, रा. नांदेड सिटी, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांचे बेकायदेशीर बांधकाम पूर्ण केले. बेकायदेशीर बांधकामाला अनधिकृत बांधकाम व निर्मुलन अप्पर जिल्हाधिकारी व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी नोटीस बजावली होती. तरीही सरकारी आदेशाचे उल्लंघन करून बांधकाम सुरू ठेवले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 कलम 52, 53, 54, 55, 56 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.