Hinjawadi : बेकायदेशीररित्या घरात घुसून घर पाडल्याप्रकरणी गुन्हा

एमपीसी न्यूज – गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांनी घरात घुसून घर पाडले. तसेच घरमालकाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास बाणेर येथे घडली.

अफजल नूरमुहम्मद खान (वय 44, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, सांतोष ढोबळे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ जागा मालकाच्या सांगण्यावरून आरोपींनी अफजल यांच्या नातेवाईकांच्या घरात बेकायदेशीररित्या प्रवेश केला. अफजल यांच्या नातेवाईकांना बाहेर काढून त्यांचे सामान घरातून बाहेर फेकून दिले. जेसीबीच्या सहाय्याने त्यांचे घर जमीनदोस्त केले. लाईट मीटर, घर असे एकूण पाच लाख रुपयांचे आरोपींनी नुकसान केले. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.