Talegaon : असभ्य भाषा वापरून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा

379

एमपीसी न्यूज – मोबाईल फोनवर बोलत असताना असभ्य भाषा वापरून शिवीगाळ केली. तसेच मारण्याची धमकी दिली. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडला. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

HB_POST_INPOST_R_A

संतोष खिलारे (वय 33, रा. वैद्य कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विशाल लोखंडे (वय 25, रा. मनोहरनगर, तळेगाव दाभाडे) विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि विशाल यांचे आपापसात भांडण होते. विशालने संतोष यांची बदनामी होईल असे सांगितले. याबाबत संतोष यांनी फोनवर विचारणा केली असता, विशालने संतोष यांना शिवीगाळ केली. तसेच तुला बघून घेतो, असे म्हणत धमकी दिली. यावरून अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संतोष  खिलारे म्हणाले, “माझे राजकीय वर्चस्व वाढत आहे. हे वर्चस्व विरोधकांना सहन होत नाही. त्यामुळे केवळ राजकीय बदनामी करण्यासाठी आणि व्यक्तिगत प्रतिमा मालिन करण्यासाठी हा डाव आखला आहे. यातून विरोधकांना केवळ स्वतःची प्रसिद्धी करायची आहे.”

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: