Akurdi: आकुर्डीत झळकले आक्षेपार्ह फलक, ‘स्मार्ट बायका कुठे जातात…?’

एमपीसी न्यूज – ‘स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा 15 ऑक्टोबर’, असा मजकूर लिहिलेले आक्षेपार्ह फलक आज (गुरुवारी)आकुर्डी परिसरात झळकले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. महिला संतप्त झाल्यानंतर संबंधितांनी ते फलक काढून टाकले. 

काही दिवसांपूर्वी पिंपळेसौदागर परिसरात ‘आय लव्ह यू शिवंडे’, ‘आयएम सॉरी’ असे फलक झळकले होते. प्रियकराने प्रियेशीची माफी मागण्यासाठी हे फलक लावण्याचे तपासात समोर आले होते. फलक लावणारा प्रियकर राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने हे प्रकरण रफादफा करण्यात आले.

त्यानंतर आज (गुरुवारी)आकुर्डीतील खंडोबा चौक ते साने चौक या दरम्यान पथदिव्यांवर आक्षेपार्ह फलक झळकले होते. ‘स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा 15 ऑक्टोबर’, असे मजकूर फलकांवर लिहिला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. एका दुकानदाराने हे फलक लावल्याची माहिती मिळत असून महिलांनी आक्रमक भुमिका घेतल्यावर हे फलक काढण्यात आले.

आकाश चिन्ह परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय खोराटे म्हणाले, ‘आकुर्डी परिसरात असे फलक लावल्याचे समजातच आमचे पथक तिथे पोहचले होते. त्यावेळी फलक काढलेले होते. तसेच फलक लावणारे देखील तिथे नव्हते.  फलक लावण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली होती’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.