Pimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो, घरगुती कचरा विलगीकरण करत असल्याचा दाखला सादर करा

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश

एमपीसी न्यूज – कचरा विलगीकरणाची व्याप्ती वाढविण्याकरिता आणि 100 टक्के विलगीकरणाचा उद्देश साध्य करण्यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या घरातील कचरा विलगीकरण स्वरुपात संकलन वाहनाकडे द्यावा. कचरा विलगीकरण करित असल्याचा दाखला नोव्हेंबर 2021 अखेर विभागप्रमुखांकडे सादर करावा, असा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील नागरिकांना दैनंदिन उत्पन्न होणारा घरगुती कचरा विलगीकण करुन कचरा संकलन वाहनाकडे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी घरगुती कच-याचे ओला, सुका, घरगुती घातक आणि सॅनिटरी वेस्ट या चार प्रकारामध्ये घरगुती कच-याचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

कचरा विलगीकरणाची व्याप्ती वाढविण्याकरिता व 100 टक्के विलगीकरणाचा उद्देश साध्य करण्यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या घरातील कचरा विलगीकरण स्वरुपात संकलन वाहनाकडे देणे बंधनकारक करणे आवश्यक आहे.

महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या घरातील उत्पन्न होणारा दैनंदिन कचरा हा ओला, सुका, घरगुती घातक व सॅनिटरी वेस्ट या चार प्रकारामध्ये विलगीकरण स्वरुपातच महापालिकेच्या संकलन वाहनाकडे सोपविणे बंधनकारक आहे.

सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कचरा विलगीकरण करित असलेबाबतचा दाखला नोव्हेंबर 2021 अखेर विभागप्रमुखांकडे सादर करावा. तसेच सर्व विभागप्रमुखांनी त्यांच्या अधिनस्थ असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचा-यांचा दाखला प्राप्त झाल्याचे प्रमाणित करावे असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.