Pimpri : रेल्वे रूळ ओलांडणा-या वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – रेल्वे रूळ ओलांडत असताना 79 वर्षीय वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास पिंपरी मधील मिल्ट्री डेअरी फार्म गेटवर झाला.

जोगिंदर सिंग अहलुवालिया (वय 79, रा. पिंपरी) असे अपघात झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

रेल्वे पोलीस विशाल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकराच्या सुमारास अहलुवालिया पिंपरी मधील मिल्ट्री डेअरी फार्म गेट ओलांडत होते. त्यावेळी पुणे-मुंबई लेनवरून आलेल्या दुरंतो एक्सप्रेसची त्यांना जोरदार धडक बसली. यामध्ये अहलुवालिया गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांची ओळख पटवून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.