Chinchwad Crime News : मंदिराबाहेर बसलेल्या जेष्ठ नागरिकाला लोखंडी पाईपने मारहाण, जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – मंदिराबाहेर बसलेल्या जेष्ठ नागरिकाला लोखंडी पाईपने मारहाण करून, जीवे मारण्याची धमकी दिली आहे. उमेश्वर महादेव मंदिर, अजंठा नगर, चिंचवड येथे गुरुवारी हा धक्कादायक प्रकार घडला.

याप्रकरणी रामदास काशीनाथ भंडलकर (वय 65, रा. उमेश्वर महादेव मंदिराजवळ, अजंठा नगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भैय्या गजरमल (वय 35, रा. उमेश्वर महादेव मंदिराजवळ, अजंठा नगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश्वर महादेव मंदिराबाहेर बसले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना लोखंडी पाईपने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.