Old Pension Scheme: अखेर संप मागे! जुन्या पेन्शनसाठी सरकार सकारात्मक

एमपीसी न्यूज : अखेर सात दिवस सुरू असलेला (Old Pension Scheme) जुन्या पेन्शनसाठीचा सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे संप समन्वय समितीने जाहीर केले. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. 

हा संप मागे घेत अवकाळीमुळे प्रलंबित असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन देत उद्यापासून कामावर वेळेत हजर राहणार असल्याचे समन्वय समितीने सांगितले.

Pimpri News : घरेलू कामगारांना सन्मानधनासाठी वयाची अट 50 ते 60 करावी

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारने एक अभ्यास समिती स्थापन केली आहे. ही समिती येत्या तीन (Old Pension Scheme) महिन्यात त्याचा अहवाल देणार असून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासाठी सकारात्मक आहेत असेही समितीने जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.