-MPC-TOP-MOST-BANNER-I

Old Pune-Mumbai Highway : लोणावळा ते खंडाळादरम्यान जुन्या महामार्गावर गुरूवारी  वाहतूक बंद राहणार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर लोणावळा ते खंडाळा दरम्यान गुरूवारी (दि. 4) दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. खंडाळ्यातील बॅटरी हील येथे ट्रेलर उलटला असून, तो बाहेर काढण्यासाठी या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात येणार आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

महामार्ग वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक बंद असताना या कालावधीत लोणावळा येथून जुन्या मार्गाने पुणे-मुंबई लेन आणि बोरघाट येथून मुंबई-पुणे लेन अशी दोन्ही बाजुची वाहतूक ‘एक्सप्रेस वे’ने वळविण्यात येणार आहे.

काम संपल्यानंतर थांबवलेली वाहने सोडण्यात येतील. गुरूवारी जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर प्रवास करणा-या प्रवाश्यांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन वाहतूक विभागाने केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.