Sangavi News : जुनी सांगवी येथील खचलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामास सुरुवात

एमपीसी न्यूज : जुनी सांगवी येथील 3 ठिकाणी खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या खचलेल्या रसत्यावर वारंवार अपघात होत असल्याने (Sangavi News) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रस्ते दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. अखेर महानगरपालिकेने या रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेतले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राजू सावळे म्हणाले की, ममतानगर ते शितोळेनगर हा 18 मीटर रुंदीचा रस्ता आहे. हा जुनी सांगवीतील एका मुख्य रस्ता आहे. येथे मुळानगर मध्ये एका ठिकाणी रस्ता खचल्याने रात्री चालकास नं दिसल्याने अपघात घडलेला आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे.

त्याठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी जवळच पडलेल्या नारळाच्या बुंध्याचे तुकडे व बॅरिकेड लावून वाहनचालकांना अपघातापासून वाचविण्यासाठी प्रयत्न केला आहे. तसेच लवकरात लवकर खचलेले रस्ते दुरूस्त करण्याची मागणीही मनसेने केली आहे.

पवार नगर गल्ली नं.1, बालाजी लॅान्स फरसान कारखाना समोरील रस्ता खचलेला आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थाप्त्य विभागाच्या अधिकार्यांना (Sangavi News) सांगितले असून त्यांच्यासोबत काल गुरुवारी त्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. साळवे म्हणाले की अधिकाऱ्यांनी आज रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.स्थाप्त्य विभागाचे अधिकारी म्हणाले की ड्रेनेजचा चेंबर फुटल्याने रस्ता खचला आहे. ड्रेनेज विभाग ते चेंबर दुरुस्त करणार आहे.

या संदर्भात एमपीसी न्यूजने 23 डिसेंबर रोजी बातमी प्रकाशीत केली होती. या बातमीची तातडीने दखल घेत दुपारी मनपाच्या ड्रेनेज विभागाने खचलेला रस्त्याच्या दुरूस्तीस सुरूवात केली.याबाबत सावळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आज संध्याकाळी ड्रेनेज विभागाने मुळानगर येथे नवीन ड्रेनेज चेंबर बांधले आहे. स्थापत्य विभागाने तेथे मोठे खडी टाकून खड्डा बुजवला आहे. तसेच स्थाप्त्य विभागाने पवार गल्ली नंबर 1, बालाजी लॉन्स जवळ आणि फरसाण कारखान्याजवळ खचलेल्या रस्त्यावर खडी टाकून खड्डा बुजवला आहे. स्थाप्त्य विभाग या चारही ठिकाणी दोन तीन दिवसानंतर डांबरीकरण करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.