Cleanliness drive : सांगवीत स्वच्छता अभियान राबवत विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी जयंती केली साजरी

एमपीसी न्यूज : जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लावर इंग्लिश मिडीयम स्कुल, लिटल फ्लॉवर विद्यालय व भारतीय विद्यानिकेतन (Cleanliness drive) विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रविवारी (दि.2) शाळेचे वर्ग व शाळेचा परिसर स्वच्छ करत स्वच्छता अभियानाने गांधी जयंती साजरी केली.

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम च्या मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, लिटल फ्लॉवर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतन च्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, ज्योती फर्तीयाल, शिक्षिका कविता मुदलीयार, नीलम मेमाणे,  सुमित्रा कुंभार, कीर्ती शिंपी, तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Pune murder : आर्थिक फसवणूक झालेल्यांनी एकत्र येत केला फसवणाऱ्याचा खून

विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या तीन माकडांची गोष्ट कथन केली आणि रघुपती राघव राजाराम व सत्यम शिवम सुंदरम् प्रार्थना सादर केली. (Cleanliness drive) तसेच विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता मुदलीयार, नीलम मेमाणे यांनी केले तर सुमित्रा कुंभार यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.