OLX Fraud : ओएलएक्सवरून ग्राहकाची 80 हजार रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ओएलएक्सवर (OLX Fraud) फ्रीज व वॉशींग मशीन विकण्याच्या बहाण्याने ग्राहकाला 80 हजार रुपयांना लुटले आहे. हा प्रकार दिघी येथे 7 ते 8 ऑगस्टच्या कालावधीत घडला.

याप्रकरणी बीपीन केशव प्रसाद (वय.28 रा.दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अमित कुमार व शिला देवी (पूर्ण नाव –पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Hinjawadi : ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी ओएलएक्सवरील (OLX Fraud) फ्रीज व वॉशींग मशीन विक्रीची जाहिरात पाहिली.त्या जाहिरातीवर संपर्क करत मशीन व फ्रीज खरेदी कऱणार असल्याचे सांगितले. आरोपींनी फिर्यादी यांना पेटीएम वरून 80 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र आज अखेर फ्रीज व वॉशींग मशीन दोन्ही न मिळाल्याने फिर्यादी यांची फसऴणूक झाली. यावरून दिघी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.