Omicron : मोठी बातमी! राज्यात ओमायक्रोनचा शिरकाव, कल्याण-डोंबिवलीत आढळला रुग्ण 

एमपीसी न्यूज: राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला आहे.  या रूग्णावर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवले  जात होते  त्याचे नमुने जीनोम चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. आज या चाचणीचा अहवाल आला. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त असल्याने  या करोना विषाणूबाबत आरोग्य यंत्रणा काळजीत आहे.

हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.