Omicron News: शहरात ‘ओमायक्रॉन’चे आणखी दोन नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेले आणखी दोन नवीन रुग्ण आज (गुरूवारी) पिंपरी-चिंचवड शहरात आढळले. एक रुग्ण यूएसए व एक रुग्ण दुबईतून शहरात आला आहे.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू आहे.

आज शहरात ओमायक्रॉनचे आणखी दोन नवीन रुग्ण आढळले. एक रुग्ण यूएसए व एक रुग्ण दुबईतून शहरात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.