Pune News : अमित शहांच्या ‘त्या’ बातमीवर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ ही तर टेबल स्टोरी’

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत केंद्रीय मंत्री अमित शहा लक्ष घालणार असल्याचे वृत्त रविवारी सायंकाळी पसरले होते. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच खुलासा केला आहे. ते म्हणाले, कुठलेही केंद्रीय मंत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घालत नाहीत.

अमित भाईने हैदराबादच्या महानगरपालिका निवडणुकीत लक्ष घातलं कारण तिथली परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अमित शहा लक्ष घालणार असं मी म्हटलं नाहीये, ही टेबल स्टोरी आहे.

मनसेसोबत जाण्याचा निर्णय केंद्रीय नेते घेतील

राज्यात अनेक दिवसापासून पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे ची युती होणार का यावर चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मनसेसोबत जाण्याचा निर्णय पुणे किंवा राज्यातील भाजपचे नेते करू शकणार नाहीत. याचा निर्णय हा केंद्रातल्या नेत्यांना करावा लागेल. राज ठाकरेंची परप्रांतीय नागरिकांबद्दलची भूमिका राष्ट्रीय स्तरावर चालणार आहे की नाही हे पाहावे लागेल. त्यामुळे मनसेसोबत जाण्याचा निर्णय केंद्रातील नेते घेतील.

उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्यातील भाषण सैरभैर

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाकडे एखाद्या त्रयस्थ माणसाने पाहिले तर तो म्हणेल हे तर सैरभैर झाले आहेत. त्यांनी केलेल्या भाषणावर आम्ही कुठलीही टीका केली नाही तर फक्त वस्तुस्थिती मांडली. आमचेच 30 – 32 कार्यकर्ते त्यांनी विधानसभेला लढवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.