सोमवार, सप्टेंबर 26, 2022

Air Force : हवाई दलाच्यावतीने पुण्यात शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शुक्रवारी हवाई दलाच्या लोहगाव येथील तळावर शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विजेत्यांशी संवादही आयोजित करण्यात आला होता. निवृत्त हवाई दल प्रमुख पी.व्ही.नाईक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला युध्द स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. हवाई दलाच्या सैनिकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सभागृहात कार्यक्रम सादर केले.त्यानंतर शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या शौर्याची गाथा सांगणारा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. निवृत्त हवाई दल प्रमुख नाईक यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला.पुरस्कार विजेत्यांशी संवाद या कार्यक्रमात या विजेत्यांनी युध्दातील आपले वैयक्तिक अनुभव आणि किस्से सांगितले.

spot_img
Latest news
Related news