Agrasen Jayanti: अगरवाल समाज फेडरेशनच्या वतीने उद्या भरणार राज दरबार

एमपीसी न्यूज –  अगरवाल समाज फेडरेशन पुणे यांच्यावतीने अग्रसेन जयंतीनिमित्त (Agrasen Jayanti) पुण्यात सोमवारी (दि.26) ‘भगवान अग्रसेनजी का भव्य-दिव्य दरबार’ या कार्यक्रमांतर्गत 18 गोत्रांच्या राजा-राणी व दरबारी यांचा आगळावेगळा जुलूस निघणार आहे. यामध्ये राजा-राणीच्या, ऋषीमुनींच्या, प्रजेच्या वेशभूषेत अगरवाल समाजाचे नागरिक सहभागी होणार आहेत.

Tourism week : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळातर्फे पर्यटन सप्ताहाचे आयोजन

हा जुलूस सकाळी साडेनऊ वाजता दापोडी येथून निघून, चिंचवड येथील अग्रसेन भवन (Agrasen Jayanti), निगडीतील भक्ती-शक्ती चौक,अग्रकुल धाम भोसरी, सोमेश्वर मंदिर विश्रांतवाडी, अग्रसेन भवन येरवडा, नगररोड समाज वडगावशेरी, दत्तवाडी स्कुल,महालक्ष्मी मंदिर स्वारगेट,खडकी धर्मशाळा येथे समाप्त होणार आहे.

या कार्यक्रमाचे संयोजन अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विनोद बन्सल,के.एल.बन्सल, शाम गोयल यांनी केले असून यांची संकल्पना व प्रस्तुती हे सांस्कृतिक समिती अध्यक्ष अग्रसैनिक सुधीरकुमार अग्रवाल, सचिव विशाल अग्रवाल, खजिनदार जी. डी. अग्रवाल करणार आहेत. या दरबारमध्ये इतर नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन अगरवाल समाज फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.