Pune : उर्मिला मातोंडकरविषयी फेसबुकवर अश्लील पोस्ट टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – फेसबुकवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरविषयी अश्लील पोस्ट टाकल्या प्रकरणी एका व्यक्तीवर  विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनसेच्या रुपाली ठोंबरे यांनी याविषयी तक्रार दिली. 

धनंजय व्यंकटेश कुडतरकर (वय 57, रा. बुधवार पेठ, पुणे), असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी याने गुरुवारी (दि.23) नऊ वाजून 41 मिनिटांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्याविषयी अत्यंत अश्लील भाषेत स्वतःच्या फेसबूक अकाउंटवर मजकूर प्रसिद्ध केला. समस्त महिला वर्गाला लज्जा उत्पन्न होईल अशा शब्दांत उर्मिला मातोंडकर यांच्याविषयी टिप्पणी केली होती.

ही पोस्ट शुक्रवारी (24) रात्री साडेदहा वाजता फेसबुक पाहत असताना रुपाली ठोंबरे यांच्या निदर्शनास आली. या आक्षेपार्ह पोस्टविरोधात त्यांनी गुन्हा दाखल केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.