Chakan : वाहन मागे घेण्यासाठी हॉर्न वाजविल्यावरून दोघांना मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – वाहन (कार) मागे घेण्यासाठी अडथळा येत असल्याने मागे असलेल्या वाहनाला (कार) बाजूला सरकण्यासाठी हॉर्न वाजवला. या रागातून सात जणांनी मिळून दोघांना लोखंडी रॉड आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 25) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास चाकण येथे घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

कुणाल गणू लोहार (वय 21, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार श्रीकांत परदेशी, करण परदेशी, विक्रम परदेशी (सर्व रा. चाकण, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुणाल आणि त्यांचे साडू चाकण येथील समाधान बिअर बार समोरून जात होते. त्यांची कार बिअर बार समोर पार्क केलेली होती. त्यांना जायचे होते. मात्र त्यांच्या कारच्या मागे आरोपींची कार होती. त्यामुळे कुणाल यांनी हॉर्न वाजवून कार बाजूला घेण्यास सांगितले. यावरून आरोपींनी कुणाल यांच्या कारची चावी काढून घेतली. चावी काढून घेतल्याचा जाब विचारला असता सात जणांनी मिळून फिर्यादी आणि त्यांचे साडू यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या पाठीवर, कानावर आणि डोक्याला गंभीर इजा झाली. तसेच आरोपींनी फिर्यादी यांच्या कारचे देखील नुकसान केले. यावरून गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like