Pimpri : महापालिका आयुक्त रजेवर, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पदभार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे 8 नोव्हेंबरपर्यंत रजेवर आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीएचे) आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे देण्यात आला आहे.

21 सप्टेंबरला लागू झालेली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 27 ऑक्टोबरला संपली आहे. आचारसंहितेच्या 37 दिवसांच्या कालावधीत महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होते. त्यामुळे महापालिकेच्या नियमित कामकाजावर परिणाम झाला. त्यातच दिवाळीच्या सलग 5 दिवस सुट्ट्या आल्या. त्यामुळे महापालिका भवनात शुकशुकाट होता. सोमवारपासून सुरळित कामकाज होईल असे अपेक्षित होते.

परंतु, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे 30 ऑक्टोबरपासून 8 नोव्हेंबरपर्यंत असे 9 दिवस रजेवर गेले आहेत. त्यानंतर दुसरा शनिवार (दि.9) व रविवार (दि.10) साप्ताहिक सुटी असल्याने ते थेट पुढील सोमवारी (दि.11) महापालिकेत रूजू होण्याची शक्यता आहे. आयुक्त रुजू झाल्यानंतरच विकासकामांना वेग येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.