Hinjawadi News : बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध फायनान्स कंपन्यांकडून सव्वाआठ लाखांचे कर्ज काढले

एमपीसी न्यूज – बनावट कागदपत्रांचा वापर करून वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून आठ लाख 22 हजार 686 रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केली. हा प्रकार 3 फेब्रुवारी ते 10 मार्च 2021 या कालावधीत सुसगाव येथे घडला. 

रनजॉय रवींद्रनाथ बॅनर्जी (वय 35, रा. सूस-पाषाण रोड, पुणे) यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. 9) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचे आधार कार्ड व पॅन कार्ड नंबर प्राप्त करून त्या आधारे बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड तयार केले. त्यावर अज्ञात इसमाने फिर्यादी यांचा फोटो, पत्ता बदलला. आरोपीने स्वतःचा फोटो व पत्ता तेथे लावून फिर्यादीच्या नावाचा वापर केला. वेगवेगळ्या फायनान्स कंपनीकडून आठ लाख 22 हजार 686 रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.