Nigdi : किरकोळ कारणावरून तरुणावर वार

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून तरुणावर वार केल्याचा प्रकार चिखली मधील जाधववाडी येथे घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 28 ऑगस्ट) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

लक्ष्मण नरेश म्हेत्रे (रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनिल निरूटे (रा. पिंपरी) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण आणि त्यांच्या पत्नी सीमा म्हेत्रे दोघेजण जाधववाडी येथील त्यांच्या घरी होते. रात्री साडेदहाच्या सुमारास अनिल त्याच्या दोन साथीदारांना घेऊन आला. त्याने लक्ष्मण यांच्याकडे त्यांना भाऊ मल्लेश म्हेत्रे यांच्याविषयी विचारले. मल्लेश कुठे आहे, त्याने माझ्यावर चोरीचा आरोप घेतला आहे, असे विचारत तिघांनी मिळून लक्ष्मण यांना दम भरला. त्यावेळी लक्ष्मण यांनी त्यांना उलट जाब विचारला असता अनिल याने कोयत्याने लक्ष्मण यांच्या डाव्या हातावर वार केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ भोये तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.