Nigdi News: अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान, रूपीनगर पोलीस चौकीला पाण्याची टाकी भेट

रुपीनगर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त उपक्रम

एमपीसी न्यूज –  रूपीनगर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठाण यांच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांची  जयंती कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरी करण्यात आली. अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर कोरोना वैश्विक संकटात आपला जीव धोक्यात घालून   कठीण काळात परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अखंडपणे सेवा देणाऱ्या स्वच्छता महीला कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य आणि कार्याची दखल घेऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त  साडी देऊन सन्मान करण्यात आला.

त्याच प्रमाणे कोरोनाच्या  वाढत्या  संसर्गामुळे शहरात रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहरातील अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. याचीच खबरदारी म्हणून रुपीनगर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठाणतर्फे चिखली पोलिस ठाणे अंकित रुपीनगर पोलिस चौकीतील अधिकारी  कर्मचारी यांचे आरोग्य निरोगी राहावे तसेच पोलिस चौकी मध्ये नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने हात वारंवार धुण्यासाठी पाण्याची टाकी भेट देण्यात आली.

पोलीस निरीक्षक संदेश इंगळे, पोलीस नाईक शंकर यमगर, नगरसेवक प्रवीण भालेकर, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, नगरसेविका संगीता ताम्हाणे, स्वीकृत सदस्य पांडुरंग भालेकर, शिक्षण मंडळ माजी सभापती धनंजय भालेकर, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, एस. डी.भालेकर, दादा नरळे, अमोल भालेकर, रामदास कुटे,  अनिल भालेकर, संदीप जाधव, संतोष पवार, राजाभाऊ धायगुडे आदी उपस्थित मान्यवर  होते.

कार्यक्रमाचे आयोजन  प्रतिष्ठाणचे  अध्यक्ष गजानन वाघमोडे, उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, दत्ता करे, शिवाजी बिटके, राजेंद्र सोनटक्के तसेच प्रतिष्ठाणच्या सर्व सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित चौगुले यांनी केले तर आभार अध्यक्ष गजानन वाघमोडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.