Nigdi : सुख आणि दु:ख हे ज्याच्या त्याच्या कर्माची फळे – प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब

एमपीसी  न्यूज – माणसांच्या जीवनात येणारे सुख आणि दु:ख हे त्यांच्या कर्माची फळे असतात. जसे कर्म करु तसेच फळ मिळते. सदाचार आणि विचारांची शुद्धाता पाळत भगवान महावीरांनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाने कसे चालावे हेच चार्तुमासात प्रत्येकाने समजून घ्यावे. प्रत्येकाने जीवनात आदर्श मुल्य आणि सात्विक वृत्ती जोपासली पाहिजे. जैन धर्मामध्ये अहिंसेला खूप महत्व आहे. हा अहिंसेचा मार्ग वाटतो तितका सोपा नाही. प्रत्येकाने व्यवहारात समाजात पर्यावरणीय अहिंसा पाळावी, असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी केले.

निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले आहे. यावेळी संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.

प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब महाराज साहेब म्हणाल्या की, हिंसा म्हणजे फक्त प्राणी हत्या नव्हे, कोणत्याही व्यक्तीला आपल्या वाणीमुळे, वर्तणुकीमुळे, व्यवहारामुळे पीडा किंवा त्रास निर्माण होणे ही देखील हिंसाच आहे. धन संपत्तीसाठी दुस-यांचे शोषण करने हिंसे समानच आहे. दुस-यांशी आपला व्यवहार चांगला असावा. लोभामुळे समाजात आर्थिक विषमता येते हे भगवान महावीरांनी सांगितले आहे. त्यामुळे व्यवहार, भावना व विचारांच्या स्तरावर देखील प्रत्येकाने समोरच्याचा आदर राखून अहिंसा पाळली पाहिजे, असेही प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.