-MPC-TOP-MOST-BANNER-I

Vadgaon Maval : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळमध्ये गुरूवारी महिला सन्मान सोहळा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुका राष्ट्रवादी महिला आघाडी व कुलस्वामिनी महिला मंचच्या वतीने वडगाव मावळ येथे गुरूवार  (दि 22) तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कोरोना योद्धांचा सन्मान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निमंत्रक महिलाध्यक्षा सुवर्णा राऊत व मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके यांनी दिली. 

वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्समध्ये गुरुवार (दि.22) सकाळी 10.30 वाजता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा होणार आहे.

या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य विठ्ठलराव शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, जिल्हा परिषद सभापती बाबुराव वायकर, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, ग्रामीण अध्यक्ष सुभाषराव जाधव, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, कैलास गायकवाड, सुनील भोंगाडे आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी तालुक्यातील महिला डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशासेविका, परिचारिका अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व कोरोना संकटात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा स्मृतिचिन्ह, साडीचोळी देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn