Vadgaon Maval : देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उर्से गावात शासकीय योजना आपल्या दारी कार्यक्रम 

विठुमाऊली सोशल फांऊडेशनचा अनोखा उपक्रम

एमपीसीन्यूज – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टी मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र अप्पा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त विठु माऊली सोशल फांऊडेशनच्या वतीने उर्से गावातील प्राथमिक शाळेच्या सभागृहात शासकीय योजना आपल्या दारी हा उपक्रम राबविन्यात आला. 

या उपक्रमात गावातील 145 लाभार्थ्यांना याचा लाभ झाला. या मध्ये जनधन खाते, शासकीय विमा योजना, आरोग्य विमा योजना, बांधकाम कामगार, संजय गांधी पेंशन योजना, नविन मतदार नोंदणी, नवीन रेशन कार्ड फॉर्म, शासकीय कर्ज योजना अशा विविध योजनांची माहीती सांगुन त्या संदर्भातील फॉर्म देखील भरण्यात आले.

भारतीय जनता पार्टी मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र अप्पा भेगडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव राक्षे, जालिंदर धामणकर, रविंद्र विधाटे, बाबुलाल गराडे, सुभाष धामणकर, बंडोपंत धामणकर, सुधीर बराटे, सरपंच भारती गावडे, उपसरपंच सविता राऊत, प्रदिप बराटे, अश्वीनी बराटे, सोपान वाळुंज, संतोष धामणकर, रोहित धामणकर, नागेश बराटे, अभिषेक बराटे, तसेच विठु माऊली सोशल फांऊडेशनचे सदस्य प्रतीभा डहाळे, सिमा भिंगारे, शेफाली कराळे, राधा भिलारे, उमेश घारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात बँक अधिकारी केशव डहाळे यांनी बँकेच्या योजनांची माहीती सांगीतली.

विठु माऊली सोशल फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण राक्षे यांनी संस्थेच्या माध्यमातुन केल्या जाणाऱ्या कार्याचा वृत्तांत सांगत या उपक्रमाचा लाभ पवन मावळ भागातील प्रत्येक घरा घरापर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार असल्याचे राक्षे यांनी सांगीतले.

भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी विठुमाऊली सोशल फांऊडेशनच्या माध्यमातुन सुरु असलेल्या समाज उपयोगी कामाचे कौतुक केले.

या कार्यक्रमात स्वागत ग्रामपंचायत सदस्य सतिश कारके यांनी केले, बाळासाहेब धामणकर यांनी आभार मानले तर बाळासाहेब खांडभोर यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.