Bhosari : शिवसेना वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

एमपीसी न्यूज – शिवसेना पक्षाच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. हा सोहळा शनिवारी (दि. 22) सायंकाळी पाच वाजता भोसरी येथील अंकुशराव लांडगे प्रेक्षागृहात होणार आहे. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा खासदारपदी निवड झाल्याबद्दल श्रीरंग बारणे आणि शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी शिवाजीराव आढाळराव-पाटील यांची निवड झाल्याबद्दल या दोघांचा भव्य सत्कार कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

सोहळ्यासाठी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपनेते रघुनाथ कुचिक, खासदार श्रीरंग बारणे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळा कदम, माजी खासदार गजानन बाबर, जिल्हाप्रमुख राम गावडे, भारतीय कामगारसेनेचे उपाध्यक्ष इरफान सय्यद, महिला आघाडी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका उर्मिला काळभोर आदी उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात करियर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना भोसरी विधानसभा, महाराष्ट्र मजदूर संघटना, भारतीय कामगार सेना महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी शहरप्रमुख महादेव गव्हाणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.