Vadgao Maval : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मावळातील शेतकरी बाळू वाघमारे यांच्या सोबत साधला लाईव्ह संवाद

एमपीसी न्यूज : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मावळ तालुक्यातील आढले बुद्रुक च्या शेतकऱ्यांसोबत जैविक खतावरील शेती व पीके यावर संवाद साधला. 

तळेगाव दाभाडे एमआयडीसीतील नोबेल एक्सचेंज कंपनीच्या जैविक खतावर बाळू नथु वाघमारे शेती करत होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जैविक खतासंबंधी प्रतिक्रिया घेण्यासाठी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मावळातील शेतकरी बाळू वाघमारे यांच्या सोबत लाईव्ह संवाद साधला.

त्यात कोणकोणती पिके घेता, जैविक खताचा उपयोग केल्यावरचा अनुभव, जैविक खतावरील धान्य, फळे पालेभाज्या ला मागणी, जैविक शेती प्रकल्प पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी येतात का, सर्वच सदस्य शेती करतात त्यात महिला शेतीला चालना देत असल्याने महिलांचे कौतुक केले.

मावळातील शेतकऱ्याचा प्रधानमंत्री मोदी यांच्यासोबत संवाद साधल्या चा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शेतकरी बाळू वाघमारे यांचीच चर्चा रंगली होती. देशाचे प्रधानमंत्री मोदी बोलत असल्याने काय उत्तर द्यावे हेच सुचत नव्हते. देशाचे प्रधानमंत्री बोलले यामुळे आनंद वाटला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.