Pune News : मंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज : आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला एका सराईत गुन्हेगाराने मारहाण करत त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मंगळवार पेठेत रविवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कुमार भागवत चव्हाण आणि प्रतिक पृथ्वीराज कांबळे (दोघेही रा. 251 मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील कुमार चव्हाण याला अटक करण्यात आली. दुसरा आरोपी प्रतीक कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगळवार पेठेत लावण्यात आलेले शासकीय कॅमेरे हलवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कॅन्सर पोलीस वरील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी प्रतीक कांबळे याने फिर्यादी यांना मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत आता तुला जिवंत सोडत नाही असे म्हणाला आणि हातातील लोखंडी कोयत्याने त्यांच्या अंगावर वार केला.

तर दुसऱ्या आरोपीने उचलून फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.