Health check up : जागतिक मधुमेह दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर

एमपीसी न्यूज : पिंपरीच्या डॉ. डी. वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या वतीने जागतिक मधुमेह दिनानिमित्त मोफत (Health check up) आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन सोमवार, दि 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते दु 2 वा यावेळेत करण्यात आले आहे. हे एकदिवसीय शिबिर डॉ. डी. वाय.पाटील विद्यापीठ सभागृहात होत आहे.

सकाळी 9 वाजता आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात होईल यामध्ये रक्तातील साखरेच्या प्रमाणाची तपासणी, हिमोग्लोबिन, बी पी, इसीजी तपासणी, (डायबेटिक न्यूरोपॅथी) पायांच्या नसांची तपासणी, (डायबेटिक रेटिनोपॅथी) डोळ्यांच्या नसांची तपासणी, भौतिकोपचार, व्यायाम आणि आहार मार्गदर्शन, मधुमेही रुग्णांच्या पायाची काळजी संबधी मार्गदर्शन (डायबेटीक फुट), मधुमेह तज्ज्ञांद्वारे करण्यात येईल तसेच स्वादुपिंड प्रत्यारोपणाची माहिती देण्यात येईल.

सकाळी 10.30 वाजता जनजागृतीपर व्याख्यानमाला सत्राला सुरुवात होईल. व्याख्यानामध्ये मधुमेह उपचार या विषयी : वैद्यक आणि प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ अनु गायकवाड, मधुमेहावर उपचार करण्यासाठी स्वादुपिंड प्रत्यारोपण: प्रसिद्ध ट्रान्सप्लांट सर्जन डॉ वृषाली पाटील, मधुमेह व त्याचे दुष्परिणाम- एंडोक्राइनोलॉजी तज्ज्ञ डॉ विनायक हराळे, मधुमेह म्हणजे काय? कश्यामुळे होतो? कारणे व प्रकार – फिजिशियन आणि प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ – डॉ विजयाश्री गोखले, आनंदाचे डोही आनंद तरंग.. ताणतणाव मुक्तीतून मधुमेह मुक्ती – सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक अनंत राऊत, मधुमेहाची वास्तविकता – मेडिसिन विभाग प्रमुख – डॉ. शुभांगी कानिटकर या व्याख्यानमालेत सहभागी होत आहेत.

Talegaon Dabhade fraud : पनवेल महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 4 लाखांची फसवणूक

जास्तीत जास्त नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी व जनजागृतीपर व्याख्यानमालेत सहभागी व्हावे असे आवाहन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.(Health check up) पिंपरी येथील डॉ. डी. वाय.पाटील विद्यापीठ सभागृहाच्या तळमजल्यावर शिबीर व चौथ्या मजल्यावर व्याख्यनमाला होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.