BNR-HDR-TOP-Mobile

Dighi : एजंटवर वार करून लुटल्या प्रकरणी आरोपीला अटक; दोन अल्पवयीन ताब्यात

गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी

एमपीसी न्यूज – फायनान्स कंपनीच्या एजंटला भरदिवसा रस्त्यात अडवणूक  करून कोयत्याने वार करत लाखाची रक्कम लुटल्या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना १७ एप्रिलला दिघी परिसरात घडली होती. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. तर घटनेतील आणखी दोन आरोपी अद्याप फरार आहेत. 

दीपक नवनाथ बन (वय-१९ रा. भोसरी), असे अटक आरोपीचे नाव असून शंभुलिंग चंद्रकांत कलशेट्टी (वय-२९ रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

आहेकलशेट्टी हा ‘पे वन’ या खासगी फायनान्स संस्थेचा एजंट आहे. तसेच शहरातील एजन्सीकडून पैसे गोळा करून तो कासारवाडी येथील कार्यालयात भरण्याचे काम करीत असे.  १४ एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास तो दिघी येथील बन्सल सिटी परिसरातून दुचाकीवर येत होता. त्यावेळी दोन ऍक्टिव्हा मोपेडवरून आलेल्या चौघांनी त्याला अडवले.  कलेक्शनचे पैसे असणारी बॅग खेचू लागले. त्याने प्रतिकार केला असता डोक्यात कोयत्याने वार करून ८८ हजार ५०० रुपयांची रोकड असणारी बॅग हिसकावून पळ काढला.

या प्रकरणी तपास करीत असताना दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असता त्यांनी चोरीची कबुली दिली. तसेच इतर साथीदारांची नावे सांगितली. यातील आरोपी बन हा भोसरी येथे त्याच्या घरी येणार असल्याची खबर पथकातील महेंद्र तातळे व सचिन उगले यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला मात्र पोलिसांना पाहताच बन याने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत त्याला आळंदीतून अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील ४९ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून पुढील तपासासाठी दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2