Bhosari : गावठी पिस्तुलासह एकाला अटक

एमपीसी न्यूज – गावठी कट्टा, पिस्तूल बाळगण्याचे प्रकार तरुणांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी देखील बळावत आहे. पोलीस अशा शस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. भोसरी पोलिसांनी गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या एका आरोपीला अटक केली. ही कारवाई इंद्रायणीनगर येथे करण्यात आली.

विकास मनोज साके (वय 23, रा देहुगाव, ता. मावळ, जि पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साके देहूगाव येथून इंद्रायणीनगर येथे गावठी पिस्तूल विकण्यासाठी आला होता. याबाबत पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठांना सांगितले. भोसरी पोलिसांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी सापळा लावला. साके याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि एक काडतूस मिळून आले. यावरून साके याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे पिस्तूल कुठून आले, कुणाला विकणार होता; याबाबत भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.