Alandi News : वेश्याव्यसायप्रकरणी दलालास आळंदी येथून अटक

एमपीसी न्यूज वेश्याव्यवसायप्रकरणी आळंदी येथून दलाला अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने अटक केले आहे. (Alandi News) ही कारवाई शुक्रवार (दि.2) आळंदी येथील मरकळ रोडवर करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक मारुती महादेव करचुंडे (वय 36) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सागर रघुनाथ पाटील/काटे (वय 24 रा. आळंदी) याला अटक केली आहे. तर त्याचे साथीदार अफताब शेख व संतोष वासुदेव घुंडरे (वय 38 रा. आळंदी) या दोघांवर गुन्ह दाखल केला असून दोघे फरार आहे.

Pune News : पुणे रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार – इंदू राणी दुबे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा महिलांकडून त्याच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करवून घेत होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केले असून पोलीस फरार आरोपीचा तपास करत आहेत. आळंदी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.