Mahavitaran : महावितरणतर्फे राज्यात दिड कोटी ग्राहकांना मिळणार स्मार्ट मिटर

एमपीसी न्यूज – वीज पुरवठ्याची गुणवत्ता व ग्राहकसेवा दर्जेदार करणे व वीजहानी कमी करण्यासाठी 39 हजार 602 कोटींच्या महावितरणच्या (Mahavitaran) सुधारित वितरण क्षेत्र योजनेला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या योजनेत एक कोटी 66 लाख ग्राहकांकडे स्मार्ट मिटर बसविण्यात येणार असून यावर सुमारे 11 हजार 105 कोटी रूपये खर्च होणार आहे.

वितरण हानी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून यावर सुमारे 14 हजार 231 कोटी रुपये खर्च होणार आहे. यात राज्यात विविध ठिकाणी 527 नवीन किव्हो उपकेंद्र उभारणे, 705 उपकेंद्रांची क्षमतावाढ करणे, सुमारे 29 हजार 893 नवीन वितरण रोहित्रे बसविणे व राज्यातील 21 शहरांमध्ये स्काडा प्रणालीचा विकास करणे इत्यादी कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण व आधुनिकीकरणावर सुमारे 14 हजार 266 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

Uddhav Thackeray : राज्यपालांना तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे

या योजनेमध्ये ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्यामुळे ग्राहकांना अचूक वीज बिल मिळणार असून परिणामी महावितरणची वीजहानी कमी होऊन महसुलात वाढ होणार आहे. राज्यातील वीज वितरण कंपन्यांची कार्यक्षमता वृध्दींगत करून आर्थिक स्थिरता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या (Mahavitaran) आर्थिक सहाय्याने सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) राबविण्यात येणार असून या योजनेमुळे महावितरणच्या वीज वितरण प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल घडून येणार आहे. सशर्त आर्थिक सहाय्यद्वारे आर्थिक स्थिरता व परिचालन कार्यक्षमतेत सुधारणे करणे, वीज वितरण पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, वीजपुरवठ्याची गुणवत्ता व उपलब्धता यात सुधारणा करणे, स्मार्ट मिटरिंग करून ऊर्जा अंकेक्षणावर भर देणे आणि वीजहानी कमी करण्याच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे अशी वैशिष्टे या योजनेची आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.