Maval Crime News : ओझर्डे गावात दीड लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील ओझर्डे गावात दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 55 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.18) दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी एका महिलेने बुधवारी (दि. 18) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 16) दुपारी चार ते बुधवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद होते. या कालावधीमध्ये चोरट्याने त्यांच्या सेफ्टी डोअर आणि आतील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाट उचकटून चोरट्यांनी एक लाख 5 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख 55 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.