BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : कंपनीतून दीड लाखांच्या कॉपर वायर चोरीला

0

एमपीसी न्यूज – चाकण येथील श्री इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनिअर्स इंडिया प्रा. लि. या कंपनीतून अज्ञात चोरट्याने 1 लाख 63 हजार 600 रुपये किमतीच्या कॉपर वायर चोरून नेल्या. ही घटना सोमवारी (दि. 2) रात्री दहाच्या सुमारास वासोली चाकण येथे घडली.

प्रमोद मोरेश्वर नानीबडेर (वय 45, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण जवळ वासोली गावात श्री इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअर्स इंडिया प्रा. लि. ही कंपनी आहे. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्याने कंपनीच्या मागच्या बाजूचा पत्रा उचकटून कंपनीमधून 1 लाख 63 हजार 600 रुपये किमतीच्या कॉपरच्या वायर चोरून नेल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

.