India Corona Update : देशात दीड लाख कोरोना रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत 264 रुग्ण दगावले 

एमपीसी न्यूज – देशात कोरोनाचा शिरकाव झाल्या पासून आज पर्यंत 1 लाख 50 हजार 114 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत देशभरात 264 रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.44 टक्के एवढा आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारी नुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 18 हजार 088 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 03 लाख 74 हजार 932 एवढी झाली आहे. त्यापैकी 99 लाख 97 हजार 272 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत त्यापैकी 21 हजार 314 बरे झालेल्या रुग्णांना गेल्या 24 तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

 

आज घडीला देशात 2 लाख 27 हजार 546 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट सध्या 96.35 टक्के एवढा झाला आहे. आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 17 कोटी 74 लाख 63 हजार 405 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी 9 लाख 31 हजार 408 नमुने मंगळवारी (दि.5) तपासण्यात आले आहेत.

 

देशाचा कोरोना रिकव्हरी रेट दिवसेंदिवस सुधारत असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक कोटीच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्राॅस घेब्रुयासिस यांनी भारतात सुरू असलेल्या लसीकरणाच्या प्रयत्नाबाबत कौतुक केले आहे. ‘जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करण्याची क्षमता भारतात आहे. आपण एकत्रितपणे जगातील सर्वात मोठं लसीकरण सुरक्षितपणे पार पाडू’, असे त्यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.