Bhosari : खोटे चलन देऊन साडेसात लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – फ्लाय अॅश बॅगचे व्यवहारापोटी रोख रक्कम घेऊन खोटे शिक्के, सह्या, बीले, चलन आणि खात्यात शिल्लक नसलेला धनादेश देऊन साडेसात लाखाची फसवणूक केली. हा प्रकार नुकताच मोशी येथे उघडकीस आला.

याप्रकरणी अभिमान भानुदास जोगदंड (वय 45, रा. आळंदीरोड, मोशी) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्षय दत्तात्रय जगताप (वय 24, रा. किवळे) याने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी अभिमान याने फ्लाय अॅश बॅगचे व्यवहारापोटी अक्षय याच्याकडून रोख रक्कम घेतली. त्यानंतर अक्षय याला टी.टी.घोलप याच्या नावाचे खोटे शिक्के, सह्या असलेले बील, चलन दिले. तसेच खात्यात शिल्लक नसलेला धनादेश देऊन साडेसात लाखाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.