Chakan : दीड लाखांची कॉपर वेल्डिंग केबल चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या गोडाउनमधून दीड लाख रुपये किंमतीची कोपर वेल्डिंग केबल चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 19) रोलेक्स मशिनरी कार्पोरेट कंपनीच्या गोडाऊनमध्ये उघडकीस आली.

पराग राम शर्मा (वय 34, रा. वाकड) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग यांचे नाणेकरवाडी येथे रोलेक्स मशिनरी कॉर्पोरेट कंपनीचे गोडाउन आहे. त्यांचे गोडाउन 15 जून ते 19 जून या कालावधीत बंद होते. या गोडाउनमध्ये ठेवलेली 80 मीटर लांबीची दीड लाख रुपये किंमतीची कॉपर वेल्डिंग केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. 19 जून रोजी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.