Pimpri : Good News : दीड महिन्याच्या बाळाने चार वर्षांच्या भावासह केली कोरोनावर मात

one and half month old baby from Sambajinagar Chinchwad fights coronavirus gets discharged from YCMH today

एमपीसी न्यूज – चिंचवड मधील दीड महिन्याच्या बाळासह त्याच्या चार वर्षीय भावाने कोरोनावर मात केली आहे. दोन्ही भावांना आज, रविवारी (दि. 17) डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे शहरात सकारात्मक वातावरण बनले आहे.

आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कोरोना बाधित दीड महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या 4 वर्षाच्या मोठ्या भावास 14 दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले. ते दोघेही कोरोना पाॅझीटीव्ह होते, ते संभाजीनगर, चिंचवडचे रहिवाशी होते.

कोरोनावर मात केलेल्या बाळाची आई मुंबईला डिलिव्हरीसाठी गेली होती. एक महिन्यांनंतर आई पुण्याला परत आली. त्यानंतर बाळाला ताप आला. त्यामुळे बाळाला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे त्याची कोरोना चाचणी केली असता बाळाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

त्यानंतर बाळाचा मोठा भाऊ आणि आजोबा सुद्धा पाॅझिटीव्ह आले होते. तर आईचा अहवाल निगेटीव्ह आला होता. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील बालरोग विभागात त्यांच्यावर उपचार केले. त्यातून ते आता संपूर्ण बरे झाले आहेत.

दीड महिन्याच्या बाळासह त्याच्या चार वर्षांच्या भावाला पूर्ण बरे करण्यासाठी वैद्यकिय अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे व डाॅ. अनिकेत लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभाग प्रमुख डॉ. दीपाली अंबिके, वैद्यकीय अधिकारी डाॅ. संध्या हरिभक्त, डॉ. सीमा सोनी, डॉ. सूर्यकांत मुंडलोड, डॉ. नुपूर कत्रे, डॉ. शीतल खाडे, डॉ. प्राजक्ता कदम, डॉ. गौरव शर्मा, डॉ. सबाहत अहमद, डॉ. अभिजीत ब्याले, डॉ. रिजवना सय्यद, डॉ. कोमल बिजारनिया व सर्व परिचारिका यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.