Hadapsar News: 21 किलो गांजासह महिलेसह एकाला अटक

एमपीसी न्यूज – हडपसर येथे छापा टाकून पोलिसांनी एक महिला व तिच्या साथादाराला 21 किलो गांजासह अटक केली आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक दोन यांनी सोमवारी (दि.5) केली आहे. अक्षय भिमा गाडे (वय 25 रा.अहमदनगर) व त्याची साथीदार 27 वर्षीय महिला यांना पोलिसांनी अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, अमंली पदार्थ विरोधी पथक हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना खबर मिळाली की, काही इसम गांजा विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी नोबल हॉस्पीटलच्या मागील पार्कींग समोरील रोडवर एक महिला व एक इसम पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा मध्ये संशयितरित्या बसले होते.

Pune News: अवयव दान, देहदानाबाबतच्या जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांची चोकशी केली व कारची झडती घेतली अशता कारमधून 4 लाख 33 हजार 760 रुपयांचा 21 किलो 688 ग्रॅम गांजा तसेच 60 हजार रुपयांचे तीन मोबाईल व कार असा एकूण 10 लाख 63 हजार 760 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींना हडपसर पोलीसांच्या ताब्यात देत त्यांच्यावर एन.डी.पी.एस. अक्ट अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचा पुढील तपास पोलीस उपनिकरीक्षक दिगंबर चव्हाण करत आहेत.

हि कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक दोन चे पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उपनिरीक्षक ए.डी. नरके, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अमंलदार संदिप शेळके, संतोष देशपांडे, प्रशांत बोमदंडी, रविंद्र रोकडे,चेतन गायकवाड,साहिल शेख, आझिम शेख, मांढरे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.