Bhosari : गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी एका गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी इंद्रायणीनगर मिनी मार्केट येथे केली. 

भीमसिंग धनसिंग थापा (वय 21, रा. बिल्डिंग नंबर 10/3, हनुमान मंदिराच्या मागे, इंद्रायणीनगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक रावसाहेब बांबळे त्यांच्या कर्मचा-यांसोबत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान तपास पथकातील कर्मचारी पोलीस शिपाई विजय दौंडकर यांना माहिती मिळाली की, इंद्रायणीनगर मधील मिनी मार्केटमध्ये एक तरुण येणार आहे. त्याच्याजवळ गावठी कट्टा आहे. या माहितीवरून पोलिसांनी मिनी मार्केट येथे सापळा लावून थापाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 20 हजार 100 रुपयांचा ऐवज मिळाला. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3(25), मुंबई पोलीस कायदा 37(1) आणि भारतीय दंड संहिता कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय तिकोळे, तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक रावसाहेब बांबळे, पोलीस हवालदार अजय भोसले, रवींद्र तिटकारे, संदीप भोसले, पोलीस नाईक संजय भोर, किरण काटकर, पोलीस शिपाई नवनाथ पोटे, विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, अमोल निघोट, करन विश्वासे, विशाल काळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.