Pune : 25 लाखांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील जाफा कंपनीतील कर्मचा-याने स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करून 25 लाखांचा अपहार करीत कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार जुलै 2018 ते मे 2019 या कालावधीत घडला. याप्रकरणी कर्मचा-याला अटक करण्यात आली आहे.

संतोष वसंतराव देशमुख (वय 38, रा. वाघोली, पुणे, मूळ, सातारा), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून याप्रकरणी हेमंत वगर (वय 37, रा. हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी हा जाफा कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता. याचा दुरुपयोग करीत संतोष याने कंपनीतून नोकरी सोडून गेलेले कर्मचारी नोकरीवर असल्याचे भासवून कर्मचा-यांचे वेतन स्वतःच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा करून घेऊन 25 लाख 18 हजार 253 रुपयांचा अपहार केला.

येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.