Pune Crime News : बीट मार्शलला मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – दारूच्या नशेत भर रस्त्यामध्ये गोंधळ घालणाऱ्या तरुणाला समजावण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्याच्या डोक्यात वीट मारणाऱ्या पंचवीस वर्षे तरुणाला अटक करण्यात आली आहे. चतुःर्श्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पांडव नगर पोलीस चौकी समोर हा प्रकार घडला.

केशवन बसवराज कांबळे (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक महेंद्र तुकाराम करगळ यांनी फिर्याद दिली असून चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी हे कर्तव्यावर असताना पांडव नगर चौकीसमोर केशवन कांबळे हा दारू किंवा त्यासारख्याच अमली पदार्थाचे सेवन करून गोंधळ घालत होता. यावेळी फिर्यादीने त्याला गोंधळ घालू नको असे समजावून सांगितले असता त्याने शिवीगाळ केली आणि प्लास्टिकची खुर्ची उचलून फिर्यादीच्या अंगावर धावून गेला. फिर्यादीने त्याला पकडून पोलीस चौकीच्या बाहेर आणले असता त्याने बाजूला पडलेली विट उचलून त्यांच्या डोक्यात मारली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.